नंदारा येथे तंमुस ने लावला प्रेमीयुगलांचा विवाह

25

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.7जानेवारी):- जितेंद्र गुलाब धारणे आणि कु. मेघा आनंदराव गायकवाड दोघेही नंदारा येथील रहिवासी असून त्याचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते त्यामुळे त्यांनी गावातील तंटामुक्त समिती कडे लग्न लावून देण्याची मागणी केल्यामुळे गावातील तंटामुक्त समितीने सदर प्रेमी युगलांचा ग्रामपंचायत कार्यालयात लावून देण्यात आला.

त्यावेळेस तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री विनायक रामदासजी गजभिये, श्री केशव गजभे ग्रामसेवक, श्री विजय ननावरे पोलीस पाटील नंदारा, श्री संजय शेडामे पोलीस पाटील मासळ तुकुम ,नामदेव खाटे, नवनाथ धारणे, संदीप समर्थ, बालकृष्ण चौधरी, सुनील धारणे ,मुकेश गायकवाड, आनंदराव गायकवाड, गोलू गायकवाड ,गुलाब धारणे, देविदास धारणे, जनार्धन जांभुळे आणि प्रवीण सलाम तसेच गावकरी उपस्थित होते.