क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती महोत्सवात गावपातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

64

🔹क्रांतीज्योती युवा फाउंडेशन, मोहबोडी यांचा उपक्रम

✒️सिंदेवाही(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिंदेवाही(दि.8जानेवारी):-माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन मोहबोडी द्वारा आयोजित 3 जानेवारी २०२१ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये क्रांतीज्योती युवा फाउंडेशन, मोहबोडी यांच्या विद्यमाने दरवर्षी गाव पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात येतो. याही वर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. फाउंडेशन तर्फे शाल, श्रीफळ, ट्राफी, प्रमाणपत्र,आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

त्यामध्ये गावातील गुरुदाजी आत्राम यांना सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी व सौ. कांताबाई मोहूर्ले यांना महिला मंडळ संघटन, सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, आणि स्वर्गीय प्रल्हाद मेश्राम यांना (मरणोत्तर) सामाजिक / सांस्कृतिक या क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती शारदाबाई मेश्राम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. व गावातील गुणवंत विद्यार्थी म्हणून फाउंडेशन तर्फे ट्राफी, प्रमाणपत्र,आणि पुष्पगुच्छ देऊन वर्ग १० वी मधून ८० % घेणाऱ्या राकेश सोमेश्वर निकुरे तर १२ वी मध्ये ७० % घेणारी कु. सपना चरणदास मोहूर्ले हिला गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बळीरामजी मोहूर्ले तर प्रमुख वक्ते म्हणून सौ. राजश्री वसाके मॅडम प्रमुख अतिथी म्हणून मधुकर गुरनुले, योगराज आत्राम, गुलाब मेश्राम, गुरुदास आत्राम, विठ्ठल आवळे, किरण मोहूर्ले, देवानंद मोहूर्ले, संजय मोहूर्ले, विजय मोहूर्ले, लिलाबाई मोहूर्ले, प्रभा मोहूर्ले, हेमलता आत्राम, वनिता ठाकरे, यांची मंचावर उपस्थिती होती.
दरवर्षी क्रांतीज्योती युवा फाउंडेशन, मोहबोडी यांच्यातर्फे गाव पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात येत असल्यामुळे गावात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये उत्साह व स्फूर्ती निर्माण होऊन समाजकार्यात लोकांची आवड निर्माण व्हावी या हेतूने व गुणवंत विद्यार्थ्यांना मध्ये अभ्यासाची आवड, स्फूर्ती, उत्साह मिळावा या हेतूने या फाउंडेशन तर्फे हे पुरस्कार दरवर्षी निवडक व्यक्तींना व विद्यार्थ्यांना देण्यात येतो.

व कार्यक्रमाप्रसंगी वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येतो. अशा या तृत कार्यासाठी क्रांतीज्योती युवा फाउंडेशन, मोहबोडी चे सर्व स्तरावरून, सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे.अशा या तृत्य कार्यासाठी क्रांतीज्योती युवा फाउंडेशन अध्यक्ष विठ्ठल आवळे, सचिव देवानंद मोहूर्ले, स्पर्धा प्रमुख विजय मोहूर्ले व निवड समितीस सदस्य राजेंद्र मोहूर्ले, ज्ञानेश्वर गुरनुले, दिलीप मोहूर्ले, संजय मोहूर्ले, प्रकाश मोहूर्ले, सुधीर मोहूर्ले, प्रवीण राजेवार सर, नागेंद्र मोहूर्ले यांचे विशेष सहकार्य लाभले.