पोलीस मित्र परिवार समनवय समिती महाराष्ट्र राज्य “कोविडं योद्धा”पुरस्काराचे वितरण

29
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.8जानेवारी):-कोरोना महामारी काळात प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला अशा कोविडं योध्याना पोलीस मित्र परिवार समनवय समिती महाराष्ट्र राज्य यांचेकडून “कोविडं योध्दा” पुरस्कार जाहीर करणेत आले होते या पुरस्काराचे वितरण काल दहिवडी,ता.माण,जि. सातारा येथे करणेत आले.
याप्रसंगी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.राजकुमार भुजबळ आणि समनवय समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष गायकवाड साहेब याचे हस्ते पुरस्काराचे वितरण करणेत आले. यावेळी जिल्हा उपाअध्यक्ष श्री.युवराज भोसले,माण तालुका अध्यक्ष श्री.संतोष घाडगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गावचे ग्रामसेवक श्री.सतीश भोसले म्हणाले पुरस्कार कोणताही असो आमच्या सारख्याना त्याचे महत्व फार मोठे असते.आज जो पोलीस मित्र परिवार समनवय समितीने आम्हाला “कोविडं योद्धा”म्हणून पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यामुळे आमच्या सारख्याना काम करण्याचे बळ मिळते एक प्रकारची ऊर्जा मिळते. या मिळालेल्या पुस्काराने प्रेरणा घेऊन भविष्यात येणाऱ्या काळात अजून जोमाने आणि प्रामाणिक पणे समाजाची,जनतेची सेवा करणार असून आपल्या ग्रामसेवक म्हणून नोकरी काळात लोकांच्या समस्या जाणून घेत राहणार आहे.त्या त्या गावात विकास कसा हिची हे पाहणार आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणाले इथून पुढे पोलीस मित्र परिवार समनवय समिती महाराष्ट राज्य या समितीकडून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आपल्या समितीकडून कार्याचा गौरव केला जाईल.