कुंडलवाडीत वीज वितरण कंपनीकडून वीजबिल वसुली मोहीमेस सुरुवात

  42

  ?एकाच दिवशी २ लाख रू.वसुल

  ?२१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

  ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

  बिलोली(दि.8जानेवारी):- तालुक्यातील कुंडलवाडी शहर व परिसरात वीज वितरण कंपनीच्या वीज बिलाच्या थकीत बिलाची वसुली मोहीम दि.७ जानेवारी पासून सुरुवात करण्यात आली असुन एकाच दिवशी दोन लाख रुपये वसुल करण्याबरोबरच २१ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असल्याची माहिती वीज वितरण कंपनी तर्फे देण्यात आली आहे.कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर गत १० महिन्यांपासुन वीजबिल वसुली थांबली होती.त्यामुळे कुंडलवाडी वीज वितरण कंपनीची थकबाकी ७० लाखांच्या वर पोहचली होती. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला होता.

  त्यातच वरिष्ठ कार्यालयाकडून वीजबिल वसुली मोहीम राबविण्याचे व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश मिळाल्यानंतर देगलूर येथील कार्यकारी अभियंता एस.जी.चाटलावार यांच्या मार्गदर्शनाखाली वीजबिल वसुली मोहीम सुरूवात करण्यात आली. दि.७ जानेवारी या पहिल्याच दिवशी वीजबिलाचे २ लाख रूपये वसुल झाले.तसेच आँनलाईन ५० हजार रूपये वीजबिल भरण्यात आले.तसेच २१ थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

  थकीत व नियमित ग्राहकांनी वीजबिल वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.या मोहीमेत प्रधान तंत्रज्ञ व्हि.एन.गुंडले,साईनाथ लोलेवार,अनिल उषलवार,बालाजी तळणे,लक्ष्मण श्रीरामे,धोंडीबा देवनपल्ले,रजनी तेलकेश्वर,मलेश मोतकेवार,निलेश संगेवार,रवी कोरेवार,योगेश शेरीयाल आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.