भाजप विरुद्ध भारत

51

एखाद्या देशातील राजसत्तेने इतकं मस्तवाल मग्रूर व्हावं कि त्या देशातील समता बंधुत्वाच्या नरडीला नख लावावं. इतकं काही दुष्ट व्यवहार करावा की स्वतःच्या देशात पारतंत्र्य नशीबी यावं. देशातील जनतेला असं वाटावं की, हा नुसता पक्ष नसून देशावर आलेलं संकट आहे. भाजपला आज घडीला भारतीय जनता देशावरील संकट माणत असून देशावरील संकट निवारण्यासाठी भारतीय जनता सिद्ध झाली आहे. भाजप विरुद्ध भारत सुरू असलेल्या लढाईत सहभागी होण्यासाठी आम्ही काही कार्यकर्ते मागच्या चारपाच दिवसांपासून दिल्ली जवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात गेलो होतो.

सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन रविदादा, सुवर्णा, वैभव, हर्षाली आणि आम्ही “किसान एकता जिंदाबाद””मोदी सरकार मुर्दाबाद”
“काले कानून रद्द करो” अशा अनेक घोषणा दिल्या. दरम्यान आम्ही अनेक आंदोलकाशी चर्चा केली. शेतकरी नेत्यांच्या भेटी घेतल्या. पत्रकारांशी चर्चा केली. साहित्यिक, कवी, कलावंतांशी चर्चा केली. चित्रपट निर्मिती करणारे ग्रुप, नाट्य ग्रुप यांच्याशी या विषयावर बोललो, राजकीय जाणकार, भाष्यकार यांची मतं जाणून घेतली. यावरून तयार झालेले हे असे मत….

■आजचे होत असलेले आंदोलन म्हणजे भाजपा चा गर्व, घमेंड, माज याचा परिपाक आहे.

■राममंदिर, नोटबंदी, CAA/NRC/NPR कलम 370 आणि लॉकडाऊन असे जे काही निर्णय झाले हे सर्व निर्णय देशहितासाठी नव्हे तर भाजप/संघाच्या इंटरेस्ट चे विषय होते अशी लोकभावना निर्माण झालेली दिसत आहे.

■भाजपा सरकार बहुमतात असल्यामुळे सरकारने लोकभावना समजून घेणे गरजेचे माणले नाही.

■बेमुर्वतखोर सरकारच्या विरोधात रस्त्यावर येण्याची हिंमत विरोधी पक्षाने दाखवली नाही कारण विरोधी पक्षातील खुप साऱ्या नेत्यांना त्यांच्या गैरव्यवहाराची चिंता होती. ED/CBI ची धास्ती होती.

■भाजप/संघाच्या विरोधात ज्यांनी कुणी आवाज उठविला त्यांचा आवाज बंद करण्यासाठी UAPA कायदा लावून अनेक कवी, लेखक, साहित्यिक, कलावंत तुरुंगात टाकून आयुष्य उद्ध्वस्त केले. अर्बन नक्षलचा शिक्का मारुन समाजात लढाऊ लोकांबद्दल संभ्रम निर्माण केला.

■सामाजिक आणि राजकीय फिल्ड वर नाकेबंदी केल्यामुळे लोकांचा आवाज बंद झाला आहे असा समज सरकारने करून घेतला आहे.

■आपलं कुणीच काही वाकडं करु शकत नाही असा समज करून घेवून सर्वशक्तिमान असल्याचे दाखले देत संघी अजेंडा राबविण्यास सुरुवात केली आहे.

■राजकीय दृष्टीने सर्वशक्तिमान बनलेल्या मोदीमुळे देशातील अंबानी, अदानी, रामदेव सारख्यांना ब्राईट फ्युचर तर सामान्य व्यापाऱ्यांना आपले भवितव्य अंधकारमय असल्याची भावना वाढीला लागली असल्यामुळे लहानसहान व्यापारी अडत्यांनी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली आहे.

■संपूर्ण मेनस्ट्रीम मिडियावर सरकारी अंकुश निर्माण झाल्यामुळे सरकारी आवाज तेवढा ऐकू येवू लागला, सर्वसामान्य माणसाचा आवाज सरकारकडे पोचण्याची सिस्टीम बंद केल्या गेली. कोंबडं झाकून सुर्य अडविण्याचा खटाटोप सुरू आहे.

■गावपातळीवरील जमीनदार, लहान पुढारी यांचे म्हत्व नष्ट करून केवळ मोदी-मोदी असे व्यक्ती महात्म्य निर्माण केले आहे.

■त्या प्रदेशातील मराठा व तत्सम मास लिडरशीप खतंम् करून ब्राम्हणी खांदेकऱ्यांना पटलावर आणले आहे.

■मास लिडरशीप निष्प्रभ केल्यामुळे जनता मोकळी झाली आहे त्यामुळे अशा प्रसंगी लिडरला manage केलं की आंदोलन गुंडाळले जायचे, आता ह्या आंदोलनात असा कुणीही नेता नाही ज्याचा जनतेवर प्रभाव आहे.

■शेतकरी आंदोलनाला कुण्या एका नेत्याचा चेहरा नसून जनतेचा चेहरा असल्यामुळे सरकारची अडचण झाली आहे, सहभागी नेत्यांची आणि सरकारची पंचायत झाली आहे.

■ज्या काही नेत्यांना सरकारने धरून ठेवले आहे, ते नेते निघून गेले तर चर्चेचा फार्स थांबून जनतेचा उद्रेक होईल अशी भिती सरकारला वाटत आहे.

■आंदोलनात फुट पडेल, आंदोलक कंटाळून निघून जातील या आशेवर सरकार दरदिवशी चर्चेच्या नावाखाली चालढकल करत आहे.

■अदानी, अंबानीच्या फायद्यासाठी केलेले कृषी कायदे रद्द करणे भाजपसाठी नुकसानकारक ठरणार आहे, त्यामुळे सरकार कायदे रद्द करील याची खात्री नाही.

■आंदोलनात पंजाब, हरियाणा, राजस्थान मधील हजारो युवक, युवती, परिवार सहभागी आहेत ज्या परिवारातील सदस्य सैन्यात आहे किंवा शहिद झालेला आहे.

■पोलीस आणि सैन्यदलात सहभागी सदस्यांचे परिवार आंदोलनात सहभागी असल्यामुळे त्यांच्यात हौतात्म्य भावना आहे.

■वरकरणी दिसणारे शेतकऱ्यांचे हे आंदोलन आता नुसत्या मागण्यांपुरते सिमीत राहिले नसून पंजाब आणि हरियाणा राज्यासाठी आत्मसन्मानाचा लढा बनले आहे.

■मोदी सारख्या सर्वशक्तिशाली नेत्यायाला देशात केवळ आपणच आव्हान देवू शकतो अशी खात्री पटल्यामुळे दिवसेंदिवस आंदोलनात पंजाब हरियाणाचा सहभाग वाढताना दिसत आहे.

■बळाचा वापर केल्यास सैन्यात आणि पोलिसांत बंड होण्याची भीती सरकारला सतावते आहे.

■सरकारला शेतकरी आंदोलनाची व्यापकता कळलेली असून देखील सरकार निर्णय घेत नाही यावरून सरकारकडे काही तरी दुष्ट योजना तयार असावी असा संशय निर्माण झाला आहे.

■नेहमी प्रमाणे भाजप सरकारने भारतीय जनतेला गृहीत धरले असून जनतेला एक तर मुर्ख बणवायचे किंवा डायव्हर्ट करायचे अशी रणनीती आखली जात आहे.

■आपण आंदोलनापासून वेगळे असायला नको अशी काळजी पंजाब हरियाणा मधील प्रत्येक परिवार घेत आहे.

■आंदोलकानी सहा महिन्याचे रेशन सोबत आणले आहे त्याला अजूनपर्यंत हात लावण्याची गरज पडलेली नाही, इतका मदतीचा ओघ सुरू आहे.

■शेतकरी शेतमजूर अशी दरी असली तरी आपण आपला वाद नंतर मिटवु “आता शेतकरी वाचवू” अशी भावना गावागावात वाढीला लागली आहे.

■सर्व आंदोलनस्थळी हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत तर त्यांच्यासमोर आंदोलकांनी घोडे तैनात ठेवून सरकारला योग्य तो इशारा दिला आहे.

■शेतकरी कायदे रद्द करून वाद थांबविण्याऐवजी शेतकऱ्यांना नागरी समाजाच्या (civil society) नजरेत आणून बदणाम करण्याची राजनिती सरकारकडून खेळली जात आहे.

■परिस्थिती अशीच चिघळत राहिली तर एकवेळ लष्करी राजवट येण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

■दलित-मुस्लिम, शेतकरी असे सर्व बिंदू विरोधात जोडले गेल्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा पारंपरिक संघी फॉर्म्युला यावेळी निष्प्रभ ठरला आहे.

■भारतात समग्र क्रांती घडवून आणण्याची संधी शेतकरी समाजाला चालून आलेली आहे.

■या आंदोलनात भाजपाची जित झाली तर देश हरणार आहे आणि शेतकऱ्यांची जित झाली तर देशात सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांती होणार आहे.

■आंदोलन इतके मोठे आहे की प्रत्येक देशवासियांने एक वेळ तरी येवून आंदोलन पाहायला हवे, चार घोषणा द्यायला हव्यात कारण यानंतर अनेक वर्षे असे आंदोलन पाहायला मिळणार नाही. कारण हे नुसते शेतकरी आंदोलन नसून भाजप विरुद्ध भारत अशी लढाई आहे.
…………..
✒️लेखक:-कॉ. गणपत भिसे
( संस्थापक अध्यक्ष लाल सेना महाराष्ट्र राज्य, परभणी जिल्हा)मो-9890946582

▪️संकलन:-नवनाथ पौळ
(केज तालुका प्रतिनिधी)
मो-8080942185

Previous articleअंधभक्त
Next article
Purogami Sandesh
पुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी ! संपादक/प्रकाशक के Whats App नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है ! - प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी