अंधभक्त

28

अमेरिकेतील लोकशाही पतनासाठी
अतिरेक्यांची गुंडगीरी
डोनाल्ड ट्रम्पच्या अंधभक्ताची
व्हाईट हाऊसवर दादागीरी..

जगात बळावली सांमतशाही
एकछत्री राजतंत्राची खुशालगीरी
जनतेचा आवाज दाबण्यासाठी
भारतातही दिसते अंधभक्तगीरी…

धर्म,वंश आणि जातीच्या
विश्वात मशगुल नेतेगीरी
आपल्या न्याय मागण्यासाठी
जनता रस्त्यावर आंदोलनकरी…

लोकशाही आेठावरी
पोटात काळोख हुकूमगीरी
कायद्याच्या जोरावरी
अन्याय करती जनतेवरी..

जेफर्सनचा मानवहक्क जाहीरनामा
उडवून लावती भोंदूगीरी
राष्ट्रवादाच्या नशामध्ये धुंद
मूलतत्ववाद्यांची जमातगीरी..

लोकांच्या राज्यामध्ये
लोकांनाचे शोषण करी
संविधानाला बंद करून
असैंवधानिक कायदे करी..

अंधभक्ताच्या तावडीतून
जगातील लोकशाहीची सुटकाकरी
जगातील समस्त लोकांनी
हुकूमशाही मग्रुरवृत्तीवर वारकरी…

✒️संदीप गायकवाड
नागपूर(मो:-९६३७३५७४००)