✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595
गेवराई(दि.9जानेवारी):-तालुक्यातील बोडखा. बु.येथील ग्रामपंचायत निवडणूकीचे वातावरण चांगलेच पेटलेले दिसत असुन वार्ड क्र.2 मधून तरुण उमेदवार कचरू भागुजी आठवले व नामदेव विश्वनाथ नारेवाड यांना मतदारातुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.घनसावंगी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवार मतदारांच्या चौकटी झिजवतांना दिसत असुन मतदारांना आश्वासनाच्या खैराती दाखवत आहेत.
बोडखा. बु.येथील वार्ड क्र. दोन मधुन तरुण उमेदवार कचरू भागुजी आठवले व नामदेव विश्वनाथ नारेवाड हे आपले नशीब अजमवत आहेत. त्यांचे गावात सामाजिक कार्य चांगले असुन त्यांना मतदारातुन चांगला प्रतिसाद मिळात आहे. पहिल्याच टप्प्यात त्यांना मतदारातुन चांगला प्रतिसाद मिळत असुन त्यांनी प्रत्यक्ष मतदार बंधू यांच्या गाठी भेटीवर भर दिला आहे.