गंगावाडी येथील शेतकऱ्याला चिरडणाऱ्या हायवासह एक आरोपी ताब्यात

27

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.10जानेवारी):-शेतात जाणार्‍या रुस्तुम मते (वय-55) या शेतकर्‍यास वाळूची अवैध वाहतूक करणार्‍या हायवाने चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास राक्षसभुवन गेवराई रोडवरील गंगावाडीजवळ घडली होती.या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तब्बल चार तासाहून अधिक काळ ठिय्या देत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

त्यानंतर पालकमंत्र्यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्यानंतर याप्रकरणातील एक हायवा व आरोपीला गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या संदर्भात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक युवराज टाकसाळ यांनी माहिती दिली.

आज शनिवारी (दि.9) हायवासह एकाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान आरोपीचे नाव पोलिसांनी घोषित केले नसून याप्रकरणात आणखी कोणाकोणाला अटक होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.