चांपा ग्रामपंचायतचे सरपंच मा.श्री आतिश पवार यांना स्व. दादासाहेब कन्नमवार ‘समाजकारण गौरव’ सन्मानपत्र पुरस्कार

    43

    ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

    नागपूर(दि.10जानेवारी):- माजी मुख्यमंत्री स्व.दादासाहेब कन्नमवार यांच्या १२१ व्या जयंती महोत्सव निमित्त मा.स्व. दादासाहेब कन्नमवार प्रचार, प्रसार समिती व बेलदार समाज संघर्ष समिती महा राज्य. यांच्या वतीने विधानभवन नागपूर येथे चांपा ग्रामपंचायतचे सरपंच मा.श्री आतिश पवार यांना स्व. दादासाहेब कन्नमवार ‘समाजकारण गौरव’ सन्मानपत्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

    आपण राजकारण क्षेत्रातून समाजसेवा करतोय.पण उद्दिष्ट मात्र एकच असते ‘समाजोन्नती समाज दायित्वातून आपण आपल्या कार्यक्षेत्रात करीत असलेले कार्य प्रशंसनीय आहे, आचरणीय आहे.भटक्या, विखुरलेल्या समाजात राहूनही आपण समाजसंघटन व प्रबोधनासाठी कार्यरत आहात हे विशेष.

    आपण राजकारणातून विकासाचे वादळ कसे उभे करता येईल यादृष्टीने प्रयत्न करीत चांपा येथील नागरिकांना विविध सोयीसुविधा मिळवून दिल्या आपल्याला राजकारणातील समाजसेवेसाठी ‘समाजकारण गौरव’ सन्मानपत्र अर्पण करताना आम्ही गौरवान्वित होत आहोत.आपल्या सर्व प्रयत्नांच्या वाटा ‘आनंदाचा गावा’ जाऊन मिळो ही अपेक्षा.