मातंगपुरी परिसरातील कुटूंबियांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा अन्यथा आंदोलन करू

    37

    ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

    शेगाव(दि.10जानेवारी)- दि.6/1/2021 रोजी मातंग पुरी परिसरातील खाजगी मालमत्ता धारक कुटीबियांना नगर परिषद शेगाव यांनी नोटीस देऊन दि.8/1/2021 रोजी तहसील कार्यालय शेगाव येथे हजार राहण्याचे म्हटले होते.
    त्या प्रमाणे मातंग पुरी परिसरातील नागरिक नोटीस मध्ये नमूद केलेले सर्व कागद पत्राची पूर्तता करून तहसील कार्यालय शेगाव येथे उपस्तित होते. परंतु नोटीस मध्ये नमूद केलेला आर्थिक मोबदला रक्कम अत्यंत कमी असल्याचे पुनर्वसितनागरिकांचे म्हणणे आहे.

    हा आर्थिक मोबदला अत्यंत कमी असल्याने आम्ही हा मोबदला घेणार नाही अशी रोख ठोक भूमिका मातंग पुरी परिसरातील नागरिकांनी घेतली असून. योग्य आर्थिक मोबदला देण्यात यावा तसेच डॉ. अण्णा भाऊ साठे नगर येथील पुनर्वसित कटुबियांना हि आर्थिक मोबदला देन्याय यावा अश्या तऱ्हेची मांगणी उपविभागीय अधिकारी खामगाव (S. D. O) यांचीशी शेगाव तहसीलदार यांच्या उपस्तित झालेल्या चर्चेत मातंगपुरी परिसरसतील पुनर्वसित नागरिकांनी केली आहे.योग्य आर्थिक मोबदला देण्यात यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा हि प्रशासनाला या निमित्याने देण्यात आला आहे.