ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात आग नियंत्रणासाठी तातडीने अद्यावत यंत्रणा बसविण्यात यावी

🔸भाजयुमो शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे यांची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.11जानेवारी):- नुकतीच भंडारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयातील शिशु केयर युनिट मध्ये अचानक लागलेल्या आगीत लहान बालकांचा होरपळून मृत्यू झाला.
त्यामुळे सदर घटनेची गांभीर्यता लक्षात घेत सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आग नियंत्रणासाठी अद्यावत सोयीसुविधा तयार करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर मागणीचे निवेदन ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ खिल्लारे यांना देण्यात आले.
सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही नीवेदन पाठविण्यात आले आहे.

रुग्णालयात सर्वत्र आगप्रतिरोधक यंत्रणा बसविणे, आगीची पुर्वसुचना देणारे अलार्म लावणे, रुग्णालयात प्रत्येक वार्डात किमान एक कर्मचारी कायम उपस्थित असले पाहिजे, रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना अग्निशमन तंत्राचे वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात यावे, रुग्णालयात आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्यासाठी आप्तकालीन मार्ग असावे, गर्दी नियंत्रणासाठी रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध असला पाहीजे, व रुग्णालयात रिक्त असलेले पदे तातडीने भरण्यात यावे अशा मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
निवेदन देतांना भाजयुमो चे शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे
,स्वप्निल अलगदेवे, रितेश दशमवार शहर महामंत्री भाजयुमो, शहर सचिव दत्ता येरावार, अन्वर शेख, रजत थोटे, प्रमोद बांगरे, अरुण बनकर, गणेश लांजेवार, भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर हे उपस्थित होते

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED