धुळे शहरातील पोलिसांनी केले दुचाकी चोरट्यांच्या पर्दाफास

88

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.11जानेवारी):– येथे देवपूरातील स्वामी नारायण मंदिराच्या बाहेरुन धमाणे येथील सोपान भिला मोरे यांची दुचाकी २४ डिसेंबर रोजी सकाळी चोरीला गेली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तीन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चाैकशी केली असता स्वामी नारायण मंदिरासह शहरात इतर ठिकाणी चोरलेल्या दुचाकींचीही त्यांनी कबुली दिली.

त्यानुसार विविध कंपनीच्या १ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकली पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई देवपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, उप निरीक्षक लोकेश पवार, हवालदार जब्बार शेख, पोलीस नाईक शशिकांत देवरे, मुकेश वाघ, किरणकुमार सावळे, विनोद अखडमल, सागर सूर्यवंशी, निखील काटकर यांच्या पथकाने केली.संबंधितांनी दुचाकी घेवून जाण्याचे आवाहन केले पोलिसांनी केले आहे.