महाराष्ट्र प्रांतीकच्या वतीने संन्ताजी जगनाडे महाराज पुण्यतिथि निमित्य संताजी दिनदर्शिका प्रकाशन

51

🔹संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथि महोत्सव

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.11जानेवारी):-महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा शाखा चिमुर च्या वतीने आज दिनांक 11 जानेवारी 2021 श्री संत शिरोमणी संन्ताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथि महोत्सव निमित्य संताजी जगनाडे महाराज यांच्या मुर्तीला माल्यार्पण करुण संन्ताजी दिनदर्शिकाचे विमोचन करण्यात आले,जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे पटशिष्य, गुरुबंधु संत शिरोमणि संताजी जगनाडे महाराज यांची 332 वी पुण्यतिथि नियोजित संताजी सभागृह चिमुर येथे साजरी करण्यात आली.

संताजी जगनाडे महाराज यांच्या फोटोचे पूजन करुण संताजी दिनदर्शिकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता अत्यंत साध्या पद्धतीने पुण्यतिथि महोत्सव पार पडला,यावेळी महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा विभागीय सचिव श्री संजयजी खाटीक, जेस्ट समाजसेवक श्री गजाननजी अगड़े, श्री भाषकरजी बावनकर, श्री, कवडु लोहकरे, श्री हरिचंदजी हिंगणकर, नगरसेवक श्री उमेश हिंगे, श्री किशोर येरने, कवडु कामडी, श्रेयष लाखे, निशिकांत बंडे, नीरज बंडे, सूरज बंडे, लोकेश बंडे, पंकज बंडे, आशीष अगड़े व अन्य समाज बांधव उपस्तित होते