लोकसेवा हमी कायदयाची प्रभावीपणे अमलबजावणी करा – रूस्तम शेख यांची मागणी

  38

  ✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  यवतमाळ(दि.11जानेवारी):-शासकीय व निमशासकीय कार्यालयां मध्ये लोकांची कामे निर्धारीत वेळेत व्हावी यासाठी शासनाने लोक सेवा हमी कायदा २०१६ साली लागु केला आहे
  या कायदयान्वे लोकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देत असताना अधिकाऱ्यांनी कर्तव्याचे भान राखून ठेवण्याची वेळापत्रक आखून देण्यात आले आहे.त्यामुळे या कायद्यामुळे कोणताही अधिकारी लोकांचे काम विनाकारण रखडुन ठेवू शकत नाही.लोकसेवा हमी कायद्याच्या चौकटीनुसार त्या अधिकाराला संबंधीतांच्या मागणी संदर्भात निर्णय घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

  बरेचदा अर्थपूर्णा व्यवहारामुळे किंवा हेतुतः नागरिकांची कामे टाळली जातात अशा परिस्थिती मध्ये नागरीकांना लोक सेवा हमी कायदयाचे कवच प्राप्त होते.त्यामुळे प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात विभागा मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवेची माहिती प्रसिद्ध करून कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे .परंतु (यवतमाळ जिल्हा )कळंब तालुक्यात बहुसंख्य जि प शाळेत अजुन पर्यंत लोकसेवा हमी कायत्याची प्रभावीणणे अंमलबजावणी झाली नसुन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळे मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवे संबधी माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही .त्या मुळे नागरीक शाळे मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवेच्या माहिती पासुन वंचित आहे.

  लोकसेवा हमी कायदयाची प्रभावीपणे अमलबजावणी होण्याच्या उद्देशाने तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत लोकसेवा हमी कायदा अर्तगत दिल्या जाणाऱ्या सेवे संबधी माहीती प्रसिद्ध करावी व त्याबाबत शाळेच्या कार्यालयाच्या दर्शनी भागावर माहिती असलेले फलक लावावे या मागणीच्या संदर्भात राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाच्या वतीने मुख्यधिकारी साहेब जि प यवतमाळ व अध्यक्ष जि प यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघांचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी दिली आहे