भंडारा प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून प्रत्येकी १० लाखाची मदत द्या- सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर

43

✒️चांदू आंबटवाड(नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगांव(दि.11जानेवारी):-भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आज दहा बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे वेळीच काळजी घेतली असती तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती भंडारा जिल्ह्यातील अख्या महाराष्ट्रातील सुन्न करणारी घटना आहे,आगीची घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ८ मुली आणि २ मुलं अशी दहा बालकं दगावली. निष्पाप बालकं गेली. ही बालकं बाहेर जन्मली होती, मात्र जन्मत: कमी वजन आणि ऑक्सिजनचा कमी पुरवठा अशी ही बालकं होती, त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री शॉर्ट सर्किटने स्पार्क झाला आणि अचानक स्फोट झाला. काळ्या धुरामुळे काहीही दिसत नव्हतं. हा धूर बालकांच्या वॉर्डमध्येही घुसला.

सात बालकांना वाचवण्यात यश आलं सगळे गाढ झोपेत असताना काळानं डाव साधला.ज्या घरांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट होणार होता. त्या कुटुंबाचं सुख काळाला पाहवलं गेलं नाही आणि त्याला सुस्थावलेल्या सरकारी व्यवस्थेचीही मदत झाली. शॉर्ट सर्किटचं निमित्त ठरलं आणि डोळे उघडून छाती भरून मोकळा श्वास घेण्याआधीच दहा कोवळ्या जिवांनी जगाचा निरोप घेतला. भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या या घटनेनंतर मातांच्या आक्रोशानं अंधार हेलावून गेला. आपल्या चिमुकल्यांसाठी टाहो फोडणार्‍या मातांना बघून सगळ्यांचे डोळे भरून आले.शनिवारची सकाळ महाराष्ट्राला ह्रदयाला पाझर फोडणारी बातमी घेऊन आली. भंडारातील जिल्हा रुग्णालयात झोपेच्या डुलक्या घेणार्‍या कोवळ्या जिवांना काळानं कवेत घेतलं. अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये १७ चिमुकल्यांपैकी दहा जणांना काळानं हिरावून घेतलं. सात चिमुकल्यांचा श्वास न घेता आल्यानं गुदमरुन मृत्यू झाला.

तर तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. कोमळ हळव्या शरीराचे झालेले ऐकून चिमुकल्यांच्या मातांचं अवसानच गळालं. क्षणभर काहीच कळालं नाही. लेकरू कायमच गेलं, हे ध्यानात येताच रुग्णालयाला हेलावून टाकणारा आक्रोश मातांच्या मुखातून बाहेर पडला. चिल्यापिल्यांसाठीचा हा आक्रोश ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले नाही. तर रुग्णालयाच्या भिंतीही शहारल्या. प्रशासन सात मुलांना वाचवल्याचं सांगत असलं, तरी दहा कुटुंब मात्र शोकात बुडाली आहे.जिल्हा रुग्णालयाकडून शॉर्ट सर्किटचं निमित्त सांगितलं जात आहे.

शासनाने त्वरित बालकांना च्या पालकांना प्रत्येकी दहा लाख रुपये येवढी मदत देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून पीडित परिवारांना न्याय द्यावा आशी मागणी – शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर सामाजिक कार्यकर्ता नांदेड यांनी एका निवेदनाद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, इवल्याशा पावलांनी घरात येऊ पाहणारं सुख सरकारी अनास्थेनं हिरावून घेतलं, ते या पैशातून मिळणार आहे का? असा सवाल दुःखाच्या सागरात बुडालेली ही कुटुंब करत आहेत,