शेती आविष्कार ऑरगॉनिक एग्रो प्रोड्युसर कंपनी ली.च्या पहिल्या प्रकल्पाचा भूमी पूजन सोहळा संपन्न

42
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-907568610

म्हसवड(दि.11जानेवारी):-एग्रो कंपनीचे संचालक अजित दडस यांनी कंपनीस दिलेल्या 15 एकरातील पहिल्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक 10 जानेवारी रोजी बीजवडी(गोसावी वस्ती),ता.माण,जि. सातारा येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमास कंपनीचे सी.ई.ओ.सिद्धार्थ खरात साहेब,मामु शेठ वीरकर,वारकरी संप्रदाय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अक्षय महाराज,कोडीबा तांबे,योगेश भोसले (उपसरपंच बिजवडी), मधुकर दडस (उपसरपंच येळेवाडी),संजय भोसले,(शिवसेना माण तालुका प्रमुख),शिवाजी महानवर,संदीप दडस,आकाश दडस(अध्यक्ष माण तालुका पत्रकार संघ),संदीप दडस,आनंदराव वीरकर(माजी अध्यक्ष मार्केट कमिटी),शिवाजी बरकडे(सरपंच येळेवाडी),वैभव महानवर,विजय बरकडे,रोहिदास दडस, अँड.विठ्ठल दडस,कृषी अधिकारी बेलसरे साहेबआणि सतीश भोसले(ग्रामसेवक, बोथे) आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत आणि सत्कार करून मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून फलकाचे आनावरन करणेत आले.संस्थेचे चेअरमन मा.अशोक भोसले यांनी जमलेल्या उपस्थित शेतकरी बांधवाना कंपनीची ध्येय धोरणे सांगून कंपनी आपल्या बिजवडी गावात पहिला प्रकल्प उभारत असल्याचे सांगत या गावाबरोबर पंचक्रोशीतील इतर गावातील शेतकरी आणि तरुण मंडळींसाठी मी आणि कंपनी व संचालक आपल्या विकासासाठी तत्पर असणार आहे जेवढ्या जास्तीत जास्त केंद्र शासन,महाराष्ट्र शासन,नाबार्डच्या योजना कंपनीच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यापर्यत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी कंपनीचे सभासद होणे गरजेचे आहे.
अशोक भोसले म्हणाले हि कंपनी तुमची आहे आम्ही फक्त चालक आहोत आपले सर्वाचे सहकार्य लाभले तर ही कंपनी महाराष्ट्रातील महत्वाच्या पहिल्या पाच कपन्यामध्ये आल्या शिवाय राहणार नाही.ज्या दडस बांधवानी कंपनीसाठी आपली स्वतःची 15 एकर जमीन पहिल्या प्रकल्पासाठी दिली त्याचे आभार मानतो.वारकरी संप्रदाय अध्यक्ष अक्षय महाराजानी कंपनीला शुभेच्छा देताना सांगितले की आपल्या माण तालुक्यातील दुष्काळी भागात हि कंपनी स्थापन झाली आहे याचा आम्हाला अभिमान वाटत आहे आपल्या सर्व मान्यवरांचे या कंपनीला सहकार्य राहणार असून ही कंपनी भविष्यात मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी या कंपनीचा आज पहिला सभासद होत असून आपल्या कंपनीला जी काही मदत लागेल ती आपण करू असे आश्वासन देऊन कंपनीला आणि सर्व टीमला शुभेच्छा दिल्या.
कंपनीचे सी.ई. ओ.सिद्धार्थ खरात साहेबांनी बोलताना सांगितले आज माणसारख्या दुष्काळी भागात आपल्या कंपनीच्या पहिल्या प्रकल्पाच्या भूमी पूजनाचा सोहळा पार पडत आहे याचा मला फार आनंद होत आहे दुष्काळी तालुक्यातील शेतकरी बांधवांची सेवा करण्याचे भाग्य या कंपनीचा माध्यमातून मला मिळते आहे आज लागेल ती मदत या कंपनीला आणि शेतकरी बांधवाना करणार असून आज मी जाहीर करत आहे की कंपनीचा सी.ई.ओ. म्हणून काम करत असताना एक रुपयाही मानधन घेणार नाही.यावेळी मामू शेठ वीरकर,संजय भोसले,कृषी अधिकारी बेलसरे साहेब,शिवाजी महानवर आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
कंपनीच्या पहिल्या प्रकल्पासाठी कंपनीचे संचालक श्री.अजित दडस आणि त्याचे बंधू व संपूर्ण कुटूंबाचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार यावेळी करणेत आला.विशेष सत्कार म्हणून बोथे गावचे ग्रामसेवक श्री.सतीश भोसले त्यांनी केलेल्या सहकार्यासाठी त्याचाही सत्कार यावेळी करणेत आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणारे ऑल इंडिया धनगर समाजाचे माण तालुका अध्यक्ष श्री.महादेव दडस सर याचाही यावेळी सत्कार करून उत्कृष्ट सूत्र संचालन केले बद्दल आभार मानले.सदर कार्यक्रमास कंपनीचे सर्व संचालक पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.