प्रधानमंत्री आवास योजनेची निधी वेळेत उपलब्ध करून द्या- रुस्तम शेख यांची मागणी

26

✒️कळंब(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कळंब(दि.13जानेवारी):- कळंब नगर पंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात आली. या योजने अंतर्गत कळंब शहरात बहू संख्य घरकुल मंजूर झालेले आहे .
परंतु लाभार्थ्यांना सुरुवातीला घरकुलाचा हप्ता देण्यात आला त्या नंतर मात्र अद्यापही उर्वरित रक्कम मिळालेली नसल्यामुळे घरकुलाचे काम अर्धवट स्थिती मध्ये पडून असून काही लाभार्थी भाड्याच्या घरात आसरा घेत आहेत .लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी नगर पंचायत कळंब यांच्या कडे प्रत्यक्ष भेट घेऊन घरकुलाच्या निधीच्या संदर्भात चर्चा केली असता शासना कडून निधी उपलब्ध झालेल्या नाही शासना कडून निधी उपलब्ध झाल्यास त्वरित वाटप करण्यात येईल अशी माहिती दिली.

घरकुल मंजूर झाले या अपेक्षेने लाभार्थ्यांनी आपले राहते घर पाडून घरकुलाचे बांधकाची सुरवात केली परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे घरकुल अर्धवट राहिले असुन प्रलंबित आहे .घरकुलाचे बांधकाम करण्या करिता काही लाभार्थ्यांनी खाजगी कर्ज काढले आहे परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे .तेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेची निधी वेळेत उपलब्ध व्हावी या मागणीच्या संदर्भात राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघ या सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ व यवतमाळ जिल्हाचे पालक मंत्री मा संजय भाऊ राठोड यांना निवेदन दिले आहे.

निवेदन देते वेळी राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघ या सामाजिक संघटनेचे मुख्य संयोजक रुस्तम शेख , यवतमाळ जिल्हा संयोजक शाहरुख शेख , रफिक कुरेशी , राजीक शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.या मागणीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली नाही तर जन आंदोलन करण्यात येईल असा तीव्र इशारा राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख यांनी दिला आहे