शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आधारकार्ड,मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी.नायब तहसीलदार निलावाड

113

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.13जानेवारी):-तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय प्राधान्य कुटूंब योजना व शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रीकाधारक लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड व मोबाईल क्रमांकाची ईकेवायसी राशन स्वस्तधान्य दुकानदाराकडे ३१ जानेवारी २०२१ पूर्वी करून घ्यावे असे आवाहन बिलोली तहसील कार्यालय पूरवठा विभागाचे नायब तहसीलदार यु.एस.निलावाड यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शिधापत्रीकाधारकांनी आपले आधारकार्ड व मोबाईल क्रमांक सत्यपण करून घ्यावे असे कळविले आहे.ज्या शिधापत्रीकाधारकांनी आपले आधार नंबर व मोबाईल क्रमांक अपडेट नसतील तर त्या शिधापत्रीकाधारकांना धान्य वाटप करता येणार नाही अशा शिधापत्रीकाची वगळणी (डीलेट) करण्यात येणार आहे.असे लाभार्थी अन्न – धान्यापासुन वंचित राहणार आहेत. लवकरात लवकर ३१ जानेवारी २०२१ पूर्वी आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक अपडेट करून घ्यावे असे आवाहन पूरवठा विभागाचे नायब तहसिलदार उत्तम निलावाड यांनी केले आहे.