वाघनख येथे माॕ जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती संपन्न

25

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.13जानेवारी):-१२ जानेवारी २०२१ ला जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख येथे राष्ट्रमाता राजमाता माॕसाहेब जिजाऊ जन्मोत्सव तथा स्वामी विवेकानंद जयंतीचा कार्यक्रम मा.प्रकाश रामटेके अध्यक्ष शा.व्य.स.यांचे अध्यक्षतेखाली तथा सौ.संध्याताई डफ उपाध्यक्षा यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना संबोधित केले की,महिलांना आत्मनिर्भर आत्मरक्षक जिजाऊंच प्रेरणादायी चरित्रच बणवू शकते,तेव्हा प्रत्येक स्त्री ने आपल्या अंतःकरणातून स्वतःला मी जिजाऊ आहे,असं जरी समजल तरी दहा हत्तीचं बळ तिच्यात संचारुन कोणत्याही संकटाचा ती सामना करु शकते,सगळे संकट नक्की घाबरुन दूर पळणार, एवढचं नव्हे तर स्वराज्याची जननी असणाऱ्या जिजाऊची प्रेरणा घेवून महिला जगावर अधिराज्य करु शकते एवढी ताकद जिजाऊ या नावात आहे. महिलांनी जिजाऊंच्या प्रेरणेने जग बदलवावे असे आवाहन केले.

स्वामी विवेकानंदानी आपल्या खऱ्या मानवतावादी मुळ महान अशा सिंधु शिवसंस्कृतीची जागतीक धर्मपरिषदेत जगाला ओळख करुन दिली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी धनराज रेवतकर सर,संतोष धोटे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.माॕ.जिजाऊ सावित्रीच्या भुमिकेत कु.श्रावणी रामटेके,कु.शारदा नैताम यांनी केलेल्या जिजाऊ सावित्रीच्या वेशभुषेने सर्वांचे लक्षकेंद्रीत केले होते.कार्यक्रमाचे संचलन कु.वैशाली गायकवाड मॕडम यांनी केले,तर आभार सौ रेखा थुटे मॕडम यांनी मानले.