चंद्रपूर (दि.13जानेवारी) रोजी 24 तासात 39 कोरोनामुक्त 14 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह – दोन कोरोना बधितांचा मृत्यू

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.13जानेवारी):- जिल्ह्यात मागील 24 तासात 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 14 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन मृत्यू झाले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 756 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 58 झाली आहे. सध्या 318 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 87 हजार 390 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 62 हजार 670 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये चामोर्शी येथील 63 वर्षीय पुरुष व बल्लारशा येथील 82 वर्षीय पुरूषाचा समावेष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 380 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 345, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 12, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 14 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील सात, बल्लारपुर एक, भद्रावती तीन, राजुरा एक, वरोरा एक व इतर ठिकाणचे एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.