मकर संक्रांती

    45

    [अष्टाक्षरी काव्यरचना]

    आला आनंदाचा सण ।
    नाव मकर संक्रांती ।।
    नभा भिडण्याचे क्षण ।
    स्वारी पतंगावरती ।१।

    तिळ गुळ गोड गोड ।
    घेरे प्रेमाने रे बोल ।।
    आज अबोला तू सोड ।
    बोल पुढे मधू बोल ।२।

    खेळा पतंगाशी मौजे ।
    स्पर्धा विमानाशी करा ।।
    दक्ष वापरावे मांजे ।
    पक्षी वाचवावे नरा ।३।

    खावे मनसोक्त गोड ।
    तुम्हा स्तव केले सारे ।।
    द्यावं खुप घ्यावं थोडं ।
    पोट सांगे सल्ला घ्यारे ।४।

    नदी तळी स्नान नको ।
    जीव शाबूत राहू दे ।।
    धावू पतंगाशी नको ।
    ऐक ‘कृगोनि’ जगू दे ।५।

    !! सन्मा.सर्व वाचक बंधुभगिनींना पुरोगामी संदेश परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या गोड गोड हार्दिक शुभेच्छा !!

    ✒️कविवर्य – ‘कृगोनि’ : श्री कृष्णकुमार निकोडे गुरुजी.
    (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी : रा.डि.शै.दै.रयतेचा वाली.)
    मु. पो. ता. जि. गडचिरोली.
    मधुभाष – ७७७५०४१०८६.
    इमेल – nikodekrishnakumar@gmail.com