नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा कमिटीच्या वतीने राजमाता मा.जिजाऊ जयंती साजरी करून वार्षिक आढावा बैठक संम्पन्न

25

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

अहमदपूर(दि.15जानेवारी):-ऑल इंडिया एस.सी.एस.टी.असोसिएशन शाखा कल्याण(ओ. एच. ई.) कल्याण येथे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा कमिटीच्यावतीने राजमाता जिजाऊ यांची जंयती साजरी करण्यात आली.यावेळी एन.डी.एम.जे. ठाणे जिल्हा वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे महासचिव अँड. डॉ. केवलजी उके होते. तसेच एन.डी.एम.जे. राज्य समन्वयक प्रा रमाताई आहिरे व राज्य संघटक आयु. शरदजी शेळके, मुंबई ठाणे प्रदेश सचिव मा.शशिकांत खंडागळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत बुध्द वंदना घेऊन महापुरुषाच्या प्रतिमेस व राजमाता जिजाऊ याच्या प्रतिमेस पुष्पमाळ अर्पण करून आणि अगरबत्ती-मेणबत्ती प्रज्वलित करून वंदन करण्या आले.

यावेळी राज्य व विभागीय कार्यकारणीतील काही मुख्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज ठाणे जिल्हा व इतर शहर आणि तालुका कार्यकारिणीची घोषणा करून पदाधिकारयांची नियुक्ती पत्र देवून नियुक्ती करण्यात आली. ठाणे जिल्हा नवनिर्वाचित समिती मध्ये अध्यक्ष मा.विजय कांबळे, उपाध्यक्ष प्रा.संतोष बनसोडे, सहसचिव सुनिल ठेंगे, जिल्हा संघटक पदी मा.संदेश भालेराव यांची निवड करण्यात आली. तसेच कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष म्हणून अॅड. प्रविण बोदडे, उपाध्यक्ष म्हणून राजेश साबळे, सचिव संदिप घुसळे आणि जिल्हा संघटक अशोक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच आयु. प्रभाकर एस.कोंगळे व मा. विलास शिवराम जाधव यांची जिल्हा सहसंघटक पदी निवड करण्यात आली. शहापुर तालुका अध्यक्ष पदी मा.रविंद्र गजानन संगारे, बदलापूर शहर अध्यक्ष पदी मा.किरणजी पवार व सचिव पदी मा.अमोल निर्मळ आणि कल्याण पुर्व अध्यक्ष पदी मा. जितेंद्र बुकाणे यांची निवड करण्यात आली.

तसेच नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्रचे महासचिव मा डॉ. केवल उके सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.राज्य समनव्यक मा.रमाताई आहिरे व राज्य संघटक आयु.शरद शेळके यांनी सुध्दा मार्गदर्शन करून राजमाता मा.जिजाऊ याच्या जीवनावरील विचार मांडले. या कार्यक्रमाचे आयोजन एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सचिव आयु.विनोद श्यामसुंदर रोकडे व जिल्हा समितीच्या सर्व पदाधिकारयांनी मिळुन केले तर सूत्र संचालन मा. जितेंद्र बुकाणे यांनी केले….