दौलापूर येथे दोन म्हशीची चोरी

24

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.15जानेवारी):-तालुक्यातील मौजे दौलापूर शिवारात आखाड्यावर बांधलेले दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि.12 जानेवारी 2021 रोजी रात्रीला घडली आहे.दौलापूर येथील नामदेव मारोती पाटील यांची शेडमध्ये बांधलेली तर मोहन नागोजी मोरे यांची शेतामध्ये आखाड्यावर बांधलेली म्हैस चोरीला गेली आहेत.

एका महीन्यापूर्वी कुंडलवाडी अर्जापूर रोडवर शेडमधून गंगाधर जेठ्ठेवार यांच्या तीन म्हशीची चोरी झाली होती.
शहर व परीसरात म्हशी चोरीच्या घटनेत चोरट्यांनी डोके वर काढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. याकडे पोलीस प्रशासन लक्ष देण्याची मागणी नागरीकातुन व्यक्त होताना दिसत आहे.