वडनेर मध्ये जेष्ठ नागरिक महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

57

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.१५जानेवारी):-स्वामी विवेकानंद व माता जीजाऊ यांची जयंती तसेच युवा दिनाचे औचित्य साधुन तालुक्यातील वडनेर येथील आधारशिला जेष्ठ नागरिक महिला मंडळ तसेच ग्रामीण रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिक महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले.
शिबिरात वैद्यकीय चमुच्या वतीने जेष्ठ महिलांची उच्चरक्तदाब,मधुमेह तसेच रक्तगट तपासणी करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सरपंचा कविता वानखेड़े या हजर होत्या.वैद्यकीय चमुमधे डॉ.नमिता बेलेकर,समुपदेशक वर्षा दांडेकर,राजेश मोहदुरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वैशाली माळोदे,श्वेता गेडाम इत्यादीचा समावेश होता.संत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिर येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात मार्गदर्शक मईहिला प्रतिनिधी प्रा.लीलाताई नरड यांचे मार्गदशनाखाली आधारशिला जेष्ठ नागरिक महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.विमला खात्री,सचिव सौ.सरला लांडगे यांचे प्रमुख उपस्थितित सदर शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.यावेळी एकूण १५० जेष्ठ महिलांची आरोग्य तपासणी करीत ५० महिलांची रक्तगट तपासणीसुद्धा करण्यात आली.शिबिराच्या यशस्वितेसाठी आधारशिला जेष्ठ नागरिक महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ.कल्पना जोगे, कोषाध्यक्ष सौ.माया शिंगोटे.सौ.सरस्वती मानकर, सौ.अर्चना खत्री,श्रीमती कमला उगे ,रूखमा झाडे तसेच इत्यादीनीसहकार्य केले.गुरूदेव सेवा मंडळ यांचेसुद्धा विशेष सहकार्य लाभले.