कृषी विभागा अंतर्गत रोजंदारी मजुरांची जेष्ठता सूची प्रसिद्ध

42

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.15जानेवारी):- कृषी विभागाअंतर्गत येत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका बिज गुणन केंद्र व फळरोपवाटीका येथील रोजंदारी मजुरांची जिल्हा स्तरावर एकत्रित अंतरीम जेष्ठता सूची जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

अंतरीम जेष्ठता सूचीबाबत रोजंदारी वरील मजूरांचे जन्मतारीख व शैक्षणीक पात्रता इत्यादीबाबत आक्षेप असल्यास त्यांनी लेखी पूराव्यासह 10 दिवसांचे आत कार्यालयात संपर्क साधावा, अन्यथा अपात्र मजुरांची नावे अंतीम यादीमधून वगळण्यात येईल, याची नोंद संबंधीतांनी घ्यावी, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी कळविले आहे.