बिलोली तालुक्यातील ६० ग्रामंपचायत निवडणुकीत ८२-१७% टक्के मतदान

30

🔹तहसिलदार वाघमारे यांची माहीती

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.16जानेवारी):-तालुक्यातील ६० ग्रामपंचायत साठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होवुन ८२-१७% टक्के मतदान झाल्याची माहीती तहसिलदार कैलासचन्द्र वाघमारे यानी दिली.

तालुक्यातील ६० ग्रामपंचायत मधुन ४७७ ग्रा.प. सदस्य निवडीसाठी आज मतदान झाले. तालुक्यात स्त्री मतदार ३३९५३ तर पुरुष मतदार ३७०७३ असे एकंदर ७१०२६ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.एकुण ८२-१७%टक्के मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले. कोठे ही अनुचित प्रकार घडला नाही. मतमोजणी दि. १८ जानेवारीला होणार आहे.