जगाला हेवा वाटेल असा अद्वितीय राजा

33

स्वराज्याचे दुसरे छत्रपती – धाकले धनी संभाजीराजे भोसले राज्याभिषेक सोहळा दिवस १६ जानेवारी …

राजमाता जिजाऊंनीघडविलेल्या, मराठा साम्राज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा संभाजी महाराज यांचा आज ३४१ वा राज्याभिषेक सोहळा.

छत्रपती शिवाजी
महाराजांच्या कर्तृत्वास शोभेल असा मराठ्यांचा राजपुत्र आजच्याच दिनी या महाराष्ट्र देशाचा छत्रपती झाला. छत्रपती शंभुराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक सदिच्छा !….

स्वराज्याचे धाकले धनी, परमपराक्रमी, परमप्रतापी, रणधूरंधर, युगंधर, बुध्दभुषणकार, युध्दभुषणकार, अजिंक्य सर्जा, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर… छत्रपती संभाजीराजे…….

कसे होते आमचे शंभुराजे …!!!

👉 १४ मे १६५७ रोजी पुरंदरावर जन्माला आलेले युगंधर म्हणजे शंभुराजे…

👉🏻 वयाच्या दुसऱ्या वर्षी आईविना पोरका झालेला बाळ म्हणजे शंभुराजे…

👉🏻 वयाच्या नवव्या वर्षी ४ हजारांची मनसबदारी स्वीकारणारे म्हणजे शंभुराजे…….

👉🏻 वयाच्या दहाव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारे शिवपुत्र म्हणजे शंभुराजे…….

👉🏻 वयाच्या अकराव्या वर्षी ५ हजारांची मनसबदारी स्वीकारणारे म्हणजे शंभुराजे…….

👉🏻 वयाच्या तेराव्या वर्षी रायप्पा महाराचा भर दरबारात सत्कार करणारे म्हणजे शंभुराजे……

👉🏻 वयाच्या चौदाव्या वर्षी महान बुध्दभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारे संस्कृतपंडीत म्हणजे शंभुराजे……

👉🏻 वयाच्या पंधराव्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन महान ग्रंथ लिहिणारे म्हणजे शंभुराजे……

👉🏻 वयाच्या सोळाव्या वर्षी १० हजार सैनिकांचे नेतृत्व करणारे कुशल सेनानी म्हणजे शंभुराजे……

👉🏻 वयाच्या सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारे म्हणजे शंभुराजे……

👉🏻 वयाच्या अठराव्या वर्षी शिवरायांच्या गादीचे पहिले युवराज म्हणजे शंभुराजे…

👉🏻 वयाच्या एकोणिसाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहू ते पंढरपूर ही पहिली
*वारी सुरू करणारे म्हणजे शंभुराजे…*

👉🏻 वयाच्या तेविसाव्या वर्षी शिवरायांच्या गादीवर बसणारे दुसरे छञपती म्हणजे शंभुराजे…

👉🏻 वयाच्या तेविसाव्या वर्षापासून बत्तीसाव्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि मोगल या पाच सत्ताधाऱ्यांशी लढणारे म्हणजे शंभुराजे…
आणि

👉🏻 वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी, आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारे शूरवीर योद्धे म्हणजे आमचे शंभुराजे…

छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा …
🙏🏻🙏🏻🙏🏻

● कळू द्या महाराष्ट्राला असे होते शंभुराजे , वादळासारखे…

|जय जिजाऊ , जय शिवराय, जय शंभूराजे…
🚩🚩🚩🚩🚩

✒️लेखक:-मा.पी.डी.पाटील सर
▪️उपशिक्षक – महात्मा फुले हायस्कूल , धरणगांव.
▪️उपाध्यक्ष – टी.डी.एफ. शिक्षक संघटना धरणगांव.