आरपीआयच्या मतांवर शिवसेने चे आमदार निवडून आल्याचा विसर पडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृतघ्नपणा करीत आहेत – गौतम सोनवणे

    40

    ?केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंना झेड सुरक्षा देण्यासाठी आरपीआयने काढला कांदिवली समतानागर येथे उत्तर प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(दि.16जानेवारी):- मागील विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आरपीआय महायुतीतुन एकत्र निवडणूक लढली. त्यात शिवसेने चे आमदार निवडुन आले; त्यांना रिपब्लिकन पक्षाची मते मिळाली. शिवसेने च्या विजयात आरपीआयचा मोठा वाटा होता. मात्र त्या मित्रत्वाकडे पाठ फिरवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कृतघ्नपणा करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला साथ देत असल्याने केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा कोत्या मनोवृत्तीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याची टीका रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे.

    आज कांदिवली पूर्व समता नगर येथे उत्तर प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयावर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मोर्चा काढून ना रामदास आठवले यांना झेड सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी गौतम सोनवणे बोलत होते. मोर्चा चे आयोजक रिपाइं चे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव यांच्या नेतृत्वात रिपाइं च्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत; झोन 12 चे पोलीस उपायुक्त स्वामी यांना निवेदन देऊन केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना झेड सुरक्षा देण्याची मागणी केली. यावेळी रिपाइं चे युवक आघाडी मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड; तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे; हरिबा कोंडे; रमेश गौड; आशिष सिंह एड अभयाताई सोनवणे आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते.