एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी ताई नागापुरेनी घेतला तिळगुळाचा कार्यक्रम

26

✒️शिवानंद पांचाळ(नायगाव प्रतिनिधी)मो:-9960748682

नायगाव(दि.17जानेवारी):- एकल महिला संघटनेच्या कामामध्ये स्वतःला अहोरात्र झोकून दिलेल्या रुक्मिणी ताई नागापुरे यांनी स्वतःचं कर्तव्य म्हणून सर्व महिलांसाठी तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या घरी आयोजित केला होता. यावेळी सर्व महिलांनी हसत-खेळत वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. समाजामध्ये एकल महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असला तरीही अनेक ठिकाणी जुन्या परंपरा घेऊन लोक एकल महिलेकडे बघतात त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी दुय्यम वागणूक मिळते तेव्हा असं घडू नये हा मनोदय यावेळी सर्वांनी व्यक्त केला तिळगुळ सोबत महिलांना वही वाण म्हणून देण्यात आली.

ही गोष्ट नक्की छोटा बदल घडवून आणण्यास पूरक आहे. यासाठी रुक्मिणी ताई नागापुरे यांचे मनापासून कौतुक करावे लागेल. या कार्यक्रमाला जयश्री पौळ, शिल्पा पंडित, शिला धनवे, ज्योती पांचाळ, कांता पाखरे, शोभा मडकर, सिन्धु पांचाळ, गंगा पांचाळ,अंजली मडकर, साधना नागापुरे, वैशाली लाड, शकुंतला खांडे, कोंडाबाई कळसकर, पुष्पा पंडित, अर्चना सानप, श्वेता घाडगे, छाया सानप आदी महिला उपस्थित होत्या.