प्रभागातील आरक्षणनुसारच उमेदवाराना उमेदवारी द्यावी

25

🔹माजी सभापती अब्दुल कदिर शेख

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.17जानेवारी):- नगर परिषदेच्या निवडणूक आरक्षण जाहीर झाला असून विविध प्रभागात उमेदवारी दावेदारी करीत आहे परंतु अनेक ठिकाण च्या प्रभागात मात्र दुसऱ्या प्रवर्ग जातीतील उमेदवार उमेदवारी दावेदारी करीत असल्याने मूळ लोकांवर अन्याय होत असल्याने राजकीय पक्षांनी आरक्षण नुसार त्या जातीतील उमेदवार द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी केली आहे

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी आरक्षण पद्धत आहे परंतु चिमूर नगर परिषद निवडणूक आरक्षण जाहीर झाले असून सर्वांना समतुल्य आरक्षण पडले परंतु ज्या प्रवर्गात जे आरक्षण पडले त्याच प्रवर्गातील कार्यकर्ते उमेदवारांना विविध राजकिय पक्षांनी संधी द्यावी जेणेकरून त्या लोकांवर अन्याय होणार नाही

उदा. चिमूर प्रभाग ८ मध्ये जनरल आरक्षण निघाले असताना यात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपले हक्क प्रस्थापित करीत आहे परंतु हा प्रभाग जनरल साठी आहे तेव्हा ओबीसी, एसी एसटी ही आपली दावेदारी करीत आहे त्यामुळे ओपन लोकांवर अन्याय होत आहे. ओबीसी, एसी व एसटी साठी राखीव तसेच जनरल राखीव असतांना ओबीसी नी या प्रभागात लक्ष घालू नये व राजकीय नेत्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असून जनरलच्या लोकांना उमेदवारी द्यावी .प्रभाग क्रमांक ५,८ व १३ मध्ये जनरल असताना मुस्लिम, ब्राम्हण, मराठा, कोमटी ,मारवाडी व ओपन मध्ये येणाऱ्या जातीतील कार्यकर्त्यांना संधी देऊन उमेदवारी देण्याची मागणी माजी नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी केली आहे….