पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतली प्रणयच्या कुटुंबियांची सांत्वना भेट

36

🔹नागपूरमधून नॉयलॉन मांजा हद्दपार करणार

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.18जानेवारी):-नायलॉन मांज्याचा बळी ठरलेल्या प्रणय ठाकरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी सांत्वन केले.
५ जानेवारीला प्रणयचा इमामवाडा परिसरात नायलॉन मांज्याने गळा कापून दुर्दैवी मृत्यू झाला होता. पालकमंत्री म्हणून जनतेला जाहीर आवाहन करून नॉयलॉन मांजाचा वापर टाळावा.

तसेच दुचाकी वाहनाने प्रवास करताना हेल्मेट वापरावे आणि गळ्यात मफलर किंवा दुपट्टा वापरावा अश्या सूचना आणि विनंती करूनही घडलेली घटना ही दुर्दैवी असून मी यामुळे व्यथित झालो आहे. ठाकरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे ,असे डॉ. नितीन राऊत यावेळी म्हणाले.

त्यांनी आदरांजली अर्पण करून ठाकरे कुटुंबियांसोबत चर्चा केली. यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव गिरीश पांडव, माजी नगरसेविका नयना झाडे, पुष्पा भोंडे, शेषराव नगरारे, प्रकाश चवरे, नरेश यादव, रमेश बडोदेकर, रामभाऊ कावडकर, मुकेश शर्मा, शेषराव काटोले, डॉ नितीन कान्होलकर राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष, तसेच चिटणीस डॉ. संकेत दुबे, प्रदेश अध्यक्ष महिला अनुसूचित जाती विभागाच्या प्रतिमाताई उके, वंदना चहांदे, रमेश गिरडकर आदी उपस्थित होते.