मौजे मुंबर ग्रामस्थांच्या वतीने आ. गुट्टे यांचा सत्कार

26

🔸दिग्रस उच्च पातळी बंधारा भूसंपादित जमिनीचा मावेजा मिळण्यास गावकऱ्यांना केले मोलाचे सहकार्य

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.18जानेवारी):-दि. १७ जानेवारी दिग्रस उच्च पातळी बंधारा भू संपादित जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा याकरिता आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी वेळोवेळी प्रयत्न केल्याने पंधरा दिवसात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार असल्याने पूर्णा तालुक्यातील मौजे मुंबर येथील ग्रामस्थांनी रामसीता सदन गंगाखेड येथे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांचा सत्कार केला. अधिकारी वर्गात समन्वय नसल्याने दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्राचे भूसंपादनाचे काम अत्यंत धीम्या गतीने चालू होते. शेतकऱ्यांना मावेजा मिळण्यासाठी बराच विलंब होत असल्याने शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याकडे येत होत्या.

दिग्रस उच्च पातळी बंधारा भूसंपादन व मावेजा मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्याकरिता आमदार गुट्टे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. अधिकार्‍यांची बैठक बोलावून दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्राच्या भूसंपादना बाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामुळे संयुक्त मोजणी झालेल्या मौजे मुंबर तालुका पूर्णा येथील शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या आत जमिनीचा मावेजा मिळणार आहे. उर्वरित गावांची भूसंपादन संयुक्त मोजणी तात्काळ करून त्यांना 31 मार्च अखेर पर्यंत मावेजा मिळणार आहे.

पूर्वी शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या मूल्यांकनानुसार प्रति एकरी आठ लक्ष रुपये मिळणार होते परंतु आ. गुट्टे यांच्या प्रयत्नामुळे सध्याचे व्हॅल्युएशन नुसार त्यांना प्रति एकरी तेरा लक्ष वीस हजार रुपये मिळणार आहेत.आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या प्रयत्नाने मौजे मुंबर येथील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मावेजामध्ये एक पटीने वाढ झाल्याने व 15 दिवसाच्या आत तो मिळणार असल्याने मौजे मुंबर येथील शेतकऱ्यांनी आ. रत्नाकर गुट्टे यांचा सत्कार करून समाधान व्यक्त केले.