सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी तात्काळ उजनी धरणातून भीमानदीव्दारे पाणी सोडण्यात यावे – आ. प्रणिती शिंदे

32

🔹कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांची मागणी

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.18जानेवारी):- आज दि. 18 जानेवारी 2021 रोजी उजनी धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत सोलापूर जिल्हयातील लोकप्रतिधींची व उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर अधिकाऱ्यांसोबत Zoom Video Conferencing व्दारे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी मागणी केली.

सोलापूर शहराकरीता उजनी धरणातून दि. 03/06/2020 रोजी पाणी सोडण्यात आले होते ते पाणी औज बंधाऱ्यात दि. 12/06/2020 रोजी पोहचले. औज बंधारा 4.5 मी. भरल्यानंतर ओव्हर फ्लो होऊन दि. 17/06/2020 रोजी चिंचपूर बंधारा 4.5 मी. भरून मिळाला. आज रोजी औज बंधा-यातील पाण्याची पातळी खालावलेली आहे.

त्यामुळे सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय येवू शकतो. त्यामुळे सोलापूर शहराकरीता पाणी पुरवठ्यासाठी पाणी टंचाई निर्माण होवू नये याकरीता उजनी धरणातून तात्काळ पाणी सोडण्यात येवून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात दि. 25/01/2021 पर्यंत पोहोचेल अश्या नियोजनाने उजनी धरणातून सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. श्री. जयंत पाटील साहेब, मंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र विकास यांच्याकडे मागणी केली.