संविधान

58

संविधान घेऊ । चल मित्रा हाती ।
वाचल्याने ख्याती । वाढणार ।।

अधिकार काय । कर्तव्य कोणते ।
वाचता कळते । संविधान ।।

वाचणारा कधी । नाही झुकणार ।
सदा बोलणार । हिम्मतीने ।।

बाबासाहेबास । मानणारा नेता ।
होणार विजेता । निश्चितच ।।

ध्यानीमनी ठेवू । फक्त संविधान ।
सर्वात महान । ग्रंथ हाच ।।

देश चालविण्या । भक्कम आधार ।
सर्वांचा दातार । भीम माझा ।।

आपल्या हक्काचा । करू उपयोग ।
भ्रष्टाचार रोग । मिटवूया ।।

काय संविधान? । घेऊ समजून ।
अजय म्हणून । विनवितो ।।

✒️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,तरनोळी
ता.दारव्हा,जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७