ब्रम्हपुरी तालुक्यातील 68 ग्रामपंचायतचा निकाल घोषित

37

🔸अनेक गावात युवकांच्या हाती सत्ता

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.18जानेवारी):- 68 ग्रामपंचायत चा निकाल घोषित
अनेक गावात युवकांच्या हाती सत्ता ब्रम्हपुरी तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीच्या ४८३ जागेकरिता शुक्रवारी मतदान पार पडले होते. तालुक्यात ८४.१४ टक्के ग्रामपंचायत निवडणुकीकरिता मतदान झाले होते . आज सोमवार १८ जानेवारला राजीव गांधी भवनात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली मतमोजणीसाठी गाव आणि मतदान केंद्गनिहाय टेबलची व्यवस्था करण्यात आली होती दुपारपर्यंत ग्रामपंचायतीचे निकाल स्पष्ट झाले.

निकाल पाहण्यासाठी उमेदवारांसहित नागरिकांनी राजीव गांधी भवना बाहेर तोबा गर्दी केली होती विजयी उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते मात्र विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यावर बंदी असल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडल्याने नाराजीचा सूर विजयी उमेदवार समर्थकांमध्ये दिसून येत होता . ६८ ग्रामपंचायतीचे गावकारभारी निकालानंतर ठरणार आहेत ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष सहभाग राहात नसला तरी , पक्षसमर्थित पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जात असते.

ब्रम्हपुरी तालुका हा दोन विधानसभा क्षेत्रात विभागाला असल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता कोणत्या पक्षाच्या समर्थितांच्या ताब्यात येते , याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते . तालुक्यात अनेक ठिकाणी तरुणाई निवडणुकीत उतरली होती तर काही ठिकाणी काँग्रेस गटात फुट पडून प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी चुरस झाली . अनेक प्रथापिथाना यावेळी धक्का बसल्याचे दिसून आले .

ब्रम्हपुरी तालुक्यात दोन विद्यमान आमदारांची व माजी आमदाराची प्रतिष्ठा पणाला लागली होती निकालानंतर तालुक्यातील बहुमतात काँग्रेस समर्थित उमेदवार विजयी तर बी.जे.पी समर्थित उमेदवार पिछाडीवर असल्याचे चित्र आहे राष्ट्रवादीनेही तालुक्यात खाते उघडले. तालुक्यातील पंचायत समिती सभापतो च्या गावात भाजपचा दारूण पराभव झाला तर चौगान येथे कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष खेमराज तिडके यांना कॉंग्रेस चे जिल्हा सचिव उमेश धोटे यांनी धक्का दिल.

खरकाडा येथे सहाही जागेवर योगेश ढोरे यांच्या आम आदमी पार्टी , भाजपा, युवा प्यानल समर्थित उमेदवार निवडून आले . नानाजी तुपट , रवींद्र ढोरे गटाचा यात दारूण पराभव झाला . तळोधी खुर्द येथे भाजपा समर्थित गटाने जोरदार मुसंडी मारली ,निलज येथे एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत नारायण मेश्राम विजयी झाले . जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती क्रिष्णा सहारे यांना त्यांच्या गावी हादरा बसला अर्हेर नवरगाव मालडोंगरी येथे राष्ट्रवादी समर्थित गटाने खाते उघडले . गांगलवाडी येथे दोन पंचवार्षिक नंतर कॉंग्रेसने एन्ट्री केली .