कोरपना तालुक्यातील नोकरी ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टी चा झेंडा

    35

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    कोरपना :- नोकरी ग्रामपंचायत निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टी चे नेते जितू मडावी यांच्या नेतृत्वाखाली गोंडवाना गणतंत्र पार्टी चे उमेदवार निवडून आले.

    ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 ग्रामपंचायत निवडणुकीत महेंद्र बिरबल हस्तक, प्रीती संदीप चौधरी, शत्रुघ्न बाबुराव शेडमाके, संगीता जितू मडावी, संजय चंपत देशमुख विजयी झाले आहे. 6 पैकी 6 उमेदवार विजयी होऊन नोकरी ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टी चा झेंडा रोवला. नोकरी गावातील बंधू भगिनींचे विजयी उमेदवारांनी जाहीर आभार मानले.

    विजयी उमेदवारांचे जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, राजुरा विधानसभा अध्यक्ष गजानन जुमनाके, जिल्हासचिव भारतभाऊ आत्राम, संजयजी सोयाम यांनी अभिनंदन केले.