जनावरांना मिळणार आधार कार्ड मूळे ओळख- डॉ नंदकिशोर मैंदळकर

35

✒️भद्रावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भद्रावती(दि.20जानेवारी):– पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर, पंचायत समिती भद्रावती,अंतर्गत पशु वैद्यकीय दवाखाना मूरसा,अंतर्गत गावातील पाळीव गाय, बैल,मैस, तीन महिन्यावरील संपूर्ण जनावरांना आधार कार्ड (बिल्ला) टोचण्याची धडक मोहीम राबविण्यात येत आहे.
सदर आधार कार्ड (बिल्ला) टोचण्याची धडक मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.चंद्रपूर जिल्यातील पशुधनाला 100/- टक्के बिल्ले टोचण्याची लक्ष माननीय पशुसंवर्धन अधिकारी डॉ अविनाश सोमनाथे पशुसंवर्धन विभाग यांनी निश्चित केले आहे.शेतकरी मित्रानो जनावराच्या कानात बिल्ला असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा लाभ पशुपालकांना मिळणार नाही.

भविष्यात गाय बैल मैस यांच्या कानात बिल्ला असल्याशिवाय खरेदी विक्री होणार नाही.जनावर नैसर्गिक आपत्तीमुळे मरण पावल्यास (उदा.वीज पडून) नुकसान भरपाई मिळणार नाही.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावर मृत पावल्यास,जनावर विधुत तारेचा करंट लागून दगवल्यास,नुकसान भरपाई मिळणार नाही.कृषी उत्पन्न बाजार समिती ,पशू बाजार येथे खरेदी विक्रीचा व्यवहार होणार नाही,कानात बिल्ला असल्याशिवाय पशु वैद्यकीय दवाखाना येथे औशोधोपचार व प्रतिबंधक लसीकरण सुविधा उपलब्ध होणार नाही.

देशातील सर्व जनावरांची ऑनलाइन नोंदणी होणार आहे.भविष्यात जनावरांची ऑनलाइन खरेदी विक्री होऊ शकते आपल्या परिसरातील गाय, बैल,मैस रोगमुक्त करण्याकरिता लाळ्या खुरकूत (FMD)lलसीकरण ला साथ द्या व जनावर रोगमुक्त व आरोग्य सुदृढ राहील याची काळजी घ्या, आपल्या अनमोल जनावरांना आधार कार्ड (बिल्ला) टोचून घ्या असे आवाहन डॉ नंदकिशोर मैंदळकर यांनी केले.