ब्रम्हपुरी न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रम संपन्न

42

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.20 जानेवारी):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,उच्च न्यायालय,मुंबई यांचे आदेशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये दिवाणी व फौजदारी न्यायालय,ब्रम्हपुरी येथे दिनांक 20/01/2021 रोज बुधवारला “मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा.गो.मोरे साहेब दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग,ब्रम्हपुरी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा.डॉ.जगदीश मेश्राम (मराठी विभाग प्रमुख,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,ब्रम्हपुरी) व विशेष अतिथी म्हणुन तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष हेमंत उरकुडे आणि जेष्ठ अधिवक्ता पी.आर.पाथोडे मंचावर हजर होते.आपल्या प्रमुख मार्गदर्शनात प्रा.डॉ.जगदीश मेश्राम यांनी मराठी भाषेचे महत्व पटवून देत संत साहित्याचे अभ्यासपुर्ण विवेचन केले तर अधिवक्ता.हेमंत उरकुडे यांनी कार्यालयीन कामकाज करतांना मराठी भाषेचा उपयोग करण्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम.जी.मोरे यांनी आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करावे जेणेकरून मराठी अस्मिता टिकुन राहील असे सांगितले.यावेळी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक एम.जी चांभारे यांच्या हस्ते न्यायालयातील कनिष्ठ लिपिक एच.जी खोब्रागडे व पी.एम.दशसहस्र यांची वरिष्ठ लिपिक म्हणुन पदोन्नती झाल्यामुळे त्यांचे फळझाडे देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अधिवक्ता.आशिष गोंडाने यांनी केले तर या कार्यक्रमाला तालुका विधिज्ञ संघाचे अधिवक्ता छबी गोहणे,अधिवक्ता.शरयु देविकर तसेच न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक बी.यु. कपाटे यांच्यासमवेत न्यायालयीन कर्मचारी संघप्रिया रामटेके (वरिष्ठ लिपिक),एन.एस बनकर (वरिष्ठ लिपिक),साबेर काझी,आशिष रामटेके,प्रशांत वालदे,पंकज कोल्हे,अंकुश मावस्कर,अजय जिभकाटे,नरेश पेंदोर,प्रियंका डोंगरे,सचिन रणदिवे इत्यादी कर्मचारी आणि पक्षकार बांधव प्रामुख्याने हजर होते.