ब्रम्हपुरी येथील रेल्वेफाटकावर उडाणपुलाची निर्मीती करा

27

🔸खासदार अशोक नेते यांना जि.प. माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे व सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वर भर्रे यांची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि. 20 जानेवारी):- ब्रम्हपुरी शहर आरोग्य व शिक्षणनगरी म्हणुन सुप्रसिद्ध आहे. याच शहरातील आरमोरी रस्त्यावर असलेल्या रेल्वेफाटकावर सतत वाहतूक कोंडी होत असल्याने रेल्वेफाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत असतात. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर बाब हि गांभीर्याने घेऊन ब्रम्हपुरी-आरमोरी रेल्वेफाटकावर उडाणपुल तयार करण्यात यावे अशी मागणी खासदार अशोक नेते यांच्या कडे जि.प. माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे व सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वजी भर्रे यांनी केली आहे.

ब्रम्हपुरी शहरालगत रेल्वेमार्ग आहे. या रेल्वेमार्गावरून गोंदिया, बल्लारशाह पँसेंजर, मालगाड्या, लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट रेल्वे गाड्या धावतात त्यामुळे दिवसातून अनेकदा फाटक बंद होत असते. सोबतच रेल्वेफाटकाच्या दोन्ही बाजुला असलेल्या गतिरोधकांची उंची जास्त असल्याने याठिकाणी सुध्दा झटका बसुन अनेकदा जड वाहने नादुरुस्त होत असल्याने मोठ्या प्रमाणात वारंवार वाहतूक कोंडी होत असते. रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहीका वाहतूक कोंडीत फसुन असतात. यामुळे अनेकदा गंभीर प्रकृति असलेला रुग्ण सुध्दा दगावू शकतो.

सदर बाबीमुळे प्रवासी, वाहनधारक यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रेल्वेफाटकावर उडाणपुलाची निर्मिती करण्यात यावी अशी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जि.प. सदस्य क्रिष्णा सहारे,सामाजिक कार्यकर्ते सिध्देश्वजी भर्रे, योगेश राऊत, नरेश चौधरी यांनी केली आहे