नेर येथे २४ जानेवारीला आगामी पोलीस भरती परीक्षा चे आयोजन

27

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.20जानेवारी):-तालुक्यातील नेर गावमधील परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुला मुलींसाठी आगामी पोलीस भरतीच्या तसेच पंचक्रोशीतील स्पर्धा बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा साठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने भव्य अशी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा साठी लाभलेले मार्गदर्शन श्री. शैलेश चौधरी सर (PSI) श्री दिनेश गवळे सर (STI) श्री. सचिन चौधरी सर (PSI)यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाणार आहे. सोमवार दिनांक २४ जानेवारी सकाळी ०९:०० वाजता धनाबाई कौतिक खलाने हायस्कूल गांधी चौक नेर ता.जि.धुळे या मैदानावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

नेर गावातील तसेच पंचक्रोशीतील मुलामुलींच्या उत्तेजनार्थ पारितोषिक वितरण करण्यासाठी गावातील काही नामवंत सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत स्पर्धेतील प्रथम विजेत्याला नेर गावातील कै. हिरामण रतन खलाणे ११,०००/- रुपयाचे प्रथम बक्षीस म्हणून जाहीर केलेले आहे. द्वितीयबक्षीस कै.धनराज भिला माळी ५,५५५/- रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे, तूतीय बक्षीस श्री अर्जुन ताराचंद भागवत ३००१/- दिलीप बिरारी सर ५००/- रुपये व प्रकाश नामदेव जाधव ५००/- असे बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे श्री. शैलेश चौधरी सर (PSI) श्री दिनेश गवळे सर (STI) श्री. सचिन चौधरी सर (PSI) या सरांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त मुला मुलींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा.

जनसेवा हीच ईश्वर सेवा या भूमिकेला पाठिंबा देणारे कार्यक्रमाचे आयोजक ड्रीम ऑफ बॉईज तर्फे आहे. आगामी काळात येणाऱ्या पोलीस, भरती वर्ग ३, सरळ सेवा भरती, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये गावातील तसेच पंचक्रोशीतील जास्तीत जास्त मुलामुलींनी भाग घेऊन निवड व्हावी, त्यांचे उज्वल भविष्य साकार व्हावे यासाठी नेर गावातील ड्रीम ऑफ बॉईज ग्रुप तर्फे ही भव्य स्पर्धा परीक्षा आयोजित केली आहे.
परीक्षेसाठी नाव नोंदणी करणे गरजेचे असून २४ जानेवारी पर्यंत आयोजक ग्रुपचे सदस्य सतीश खलाणे, राहुल देवरे व विशाल निकुंभे यांच्याकडे परीक्षेच्या दिवशी नोंदणी करावयाची आहे नोंदणी शुल्क १००/- रुपये असून सदर परीक्षा ही शासनाने कोरोना संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांच्या आधारे असणार आहे, विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी येताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून येणे तसेच पेन व पॅड आणणे बंधनकारक आहे. *आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने* *नेर गावात भव्य वस्तुनिष्ठ स्पर्धा*