सालेकर कुटुंब तिळसंक्रांतीचा सण महापुरुषांच्या पुस्तकरुपी विचाराचे वाणं वाटून करतात साजरा

30

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.20जानेवारी):-तिळसंक्रात हा महिलांसाठी आनंदाचा सण. हा सण १५ दिवस चालतो. या सनाला महिला नवनवीन कपडे अलंकार परिधान करुन एकमेकींच्या घरी वाणासाठी जात असते. या वाणाकरीता प्रत्येक महिला पाचशे ते पाच हजारपर्यंत वाणाकरीता वस्तुखरेदी करीता खर्च करतात. त्यामध्ये निरुपयोगी छोट्या मोठ्या स्टील प्लॕस्टीकच्या तकलादु वस्तु पैसा खर्च करुन एकमेकींना वाणं म्हणून वाटप करतात. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील पतीचा शिक्षकी पेशा असलेले मराठा सेवा संघाच्या विचाराने प्रेरीत सालेकर कुटुंबीय समाज जागृतीचा ध्यास घेवून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसारासाठी आपल्या आचरणातून आचारविचातून विविध उपक्रमातून समाजापुढे नवा आदर्श ठेवण्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे दिसून येते.

अशाच तिळसंक्रांतीच्या सणाचे औचित्ये साधून निरुपयोगी वस्तुंवर पैसा खर्च करुन वाणं म्हणून अशा वस्तु भेट देण्यापेक्षा त्याचं पैशात छोटी मोठी महापुरुषांच्या चरित्रांची पुस्तके खरेदी करुन दरवर्षी वाटप करीत असते. असाच आदर्श घेवून प्रत्येक महिलेने अशी महापुरुषांच्या जीवन चरित्रांची पुस्तके भेट वस्तू म्हणून जर वाणात वाटली तर घराघरात या महापुरुषांची जीवन चरित्रे पोहचतील जेनेकरुन कुटुंबातील सर्व मुले अबालवृद्धापासून वाचन होईल. आपल्या वाचनात आलेलं एखादं पुस्तक आपल्या आयुष्याचं सोनं करु शकते. भावी पिढीला ह्या महापुरुषांचे आदर्श विचार व त्यांचे कार्यच जीवनाचा खरा मार्ग दाखवू शकते. यावर या परिवाराचा दृढ विश्वास असून दरवर्षी तिळसंक्रांतीच्या सनाला या कुटुंबाकडून महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांचे वाणं वाटल्या जाते.
————-