शिंदखेडा शहरातील प्रभाग क्रमांक 9 लक्ष्मीनारायण कॉलनी येथे दोन पक्षी मरून पडले आहे

43

🔹ब्लड फ्लुय चा कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.20जानेवारी):- शहरातील प्रभाग ९ मध्ये लक्ष्मीनारायण काॅलनित दोन पक्षी मरुन पडले होते एक कबुतर व टिटिला पक्षी मरुन पडले आहे.ब्लड फ्लुय चा शंकेने काॅलनितिल परिसरातील नागरीकान मध्ये भितीचे वातावरन येथील महेश चव्हाण याने नगरसेवक सुनील चौधरी यांना फोन करून माहिती दिली, त्याची तत्काल दखल घेत नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी यांना व पक्षु वैधकिय डाॅक्टर हितेंद्र पवार याचाशी संपर्क करुन त्याना बोलविले व ते तात्काळ येऊन कार्यवाही चालु केली.

क्षुवैधकिय डाॅक्टर हितेंद्र पवार तसेच परिचर जितेंद्र गिरासे, विक्रम बैसाणे यांनी काॅलनित येऊन पक्षी घेऊन गेले व पुढील तपास करुन माहिती देणार आहेत.या वेळी प्रभागातील नगरसेवक तथा विरोधीपक्ष नेते सुनील चौधरी ,जीवन देशमुख, जय सोणवणे, छत्रपाल गिरासे, हर्षल पवार, महेश चव्हाण व नागरिक उपस्थित होते