दलित वस्त्यांना पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मानवी हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेकडून उपोषणाचा इशारा

    37
    ✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

    म्हसवड(दि.22 जानेवारी):-मानवी हक्क अभियान महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री.धर्मराज लोखंडे यांनी दलित वस्त्यांमध्ये पाणीपूरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आज म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देणेत आले.
    निवेदनामध्ये म्हसवड नगरपरिषदेमार्फत शहरात ज्यापद्धतीने पाणीपुरवठा केला जातो त्यानुसार दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा होत नाही गावातील इतर भागात चार दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो आणि दलित वस्त्यांमध्ये आठ दिवसातून पाणीपुरवठा होतो हा दलितांवर जाणून बुजून अन्याय केला जात आहे. पाणीपट्टी सर्वाना सारखीच असताना नगरपरिषदेकडून दलीतांना सापत्नकाची वागणूक दिली जात आहे.अधिकाऱयांना वारंवार भेटून लेखी निवेदन देऊन सुद्धा या विषयाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे.

    दलित वस्त्यांना पाणीपुरवठा योग्य पद्धतीने व्हावा हा आमच्या दलितांचा मानवी हक्क असून त्या हक्कापासून आम्हा दलितांना जाणून बुजून गेली अनेक वर्षे वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे तो आम्ही खपवून घेणार नाही.गावातील इतर भागात ज्या पद्धतीने पाणीपुरवठा होतो तसा येत्या आठ दिवसात दलित वस्त्यांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत झाला नाहीतर म्हसवड नगरपरिषदेच्या विरोधात दलितांच्या न्याय हक्कासाठी दि.25 जानेवारी 2021 पासून मानवी हक्क अभियान सातारा जिल्हा आणि म्हसवड येथील दलित बांधवांच्या वतीने आमरण उपोषण केले जाईल.यापुढे दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आंदोलन उभारले जाईल.याचबरोबर घनटागाडी दररोज सुरु करावी,रमाई घरकुल योजनेचा दुसरा हफ्ता लाभार्थ्याच्या खात्यावर त्वरित जमा करावा,मल्हारनगर येथील आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाची त्वरित दुरुस्ती करावी अशा इतर विविध मागण्यांसाठी निवेदन देणेत आले.