प्रहार सेवक यांनी चिमूर ते माकोना एस.टी.बस सेवा सुरु करण्याबाबत बस आगार प्रमुख यांना दिले निवेदन

    35

    ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमूर(दि.22जानेवारी):- चिमूर ते माकोना एस.टी. बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी करणारे प्रहार संघटनेचे कार्यकर्त्यांनी चिमूर आगार व्यवस्थापक यांना सादर केले.सावरी परिसरातील सुमारे 50 ते60 विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी बोथली येथे दररोज जाणे-येणे करीत असतात. सावरी ते बोथली हे ५ किलोमीटरचे अंतर आहे.विद्यार्थी प्रवास सायकलने करतात, परीसर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी आहे.

    विद्यार्थी प्रवास करताना जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे या परिसरात वन्यप्राणी वावर जास्त प्रमाणात दिसून येतो. या परिसरात वाघ, अस्वल, डुकर व अन्य जंगली प्राण्यांचा नेहमी धुमाकूळ असतो.

    तरी विद्यार्थ्यांसाठी चिमूर ते माकोना पूर्व बस सेवा सुरु करण्यात यावी,अशी मागणी बस आगार प्रमुख यांना निवेदनातून केली. निवेदन सादर करताना प्रहार सेवक विनोद उमरे, प्रहार सेवक, स्वप्नील खोब्रागडे, प्रहार सेवक लोकेश मंगरे, सचिन घानोडे, नारायणन निखाडे, मुरलीधर रामटेके, संदीप निखाडे, नारायणन मत्ते आदी उपस्थित होते.