रिपाईच्या ग्रामपंचायत विजयी उमेदवारांचा राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते सत्कार

26

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

अक्कलकोट(दि.22जानेवारी):- आगामी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या विजयी उमेदवाराचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अक्कलकोट तालुक्यात झालेल्या ७२ ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे एकुण ३४ उमेदवार विजयी झाले आहेत.

रिपब्लिकन पक्ष्याची अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधणी असुन पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या योग्य नियोजनातून व तालुक्यात असलेल्या मोठ्या जनसंपर्क मुळे हे शक्य झाले आहे असे बोलुन तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांचे विशेष अभिनंदन केले व येणाऱ्या काळात ज्या ग्रामपंचायत रिपब्लिकन पक्षाचे सदस्य निवडुन आलेत.

त्या सर्व ग्रामपंचायतीस केंद्रीय मंत्री खा रामदासजी आठवले यांच्या तर्फे भरपुर निधी उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन देऊन विजयी सदस्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी रिपाइं अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड, नुतन ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार गायकवाड, रवी गायकवाड, कविता गायकवाड,अजय गायकवाड,भीमाशंकर गायकवाड, सोलापूर शहर संपर्क प्रमुख समीर नदाफ,संतोष काकडे आदी उपस्थित होते.