दिवशी येथील पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घुण खून करणाऱ्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा द्या – विक्रम पाटील बामणीकर

31

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

भोकर(दि.22जानेवारी):- तालुक्यातील दिवशी ( बु.) येथे साल गड्याने मालकाच्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची घटना दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली महाराष्ट्रामध्ये अशा वारंवार घटना घडत आहेत त्यासाठी सरकारने तातडीने अशा नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देऊन या चिमुकलीला न्याय देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवराज्य युवा संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी गजाआड केले आहे आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भोकर तालुक्यातील दिवशी ( बु.) येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली मयत ५ वर्षीय चिमुकली बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती घरच्यांनी चिंताग्रस्त होत बेपत्ता मुलीचा शोध घेत असतानाच सायंकाळी शेतालगत असलेल्या सुधा नदीच्या पात्रात मुलीचा मृतदेह दिसून आला तसेच शेतात काम करणारा सालगडी बाबू उकंडू सांगेराव हाही बेपत्ता होता याबाबत भोकर पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मयत मुलीचा मृतदेह काढत असताना लगतच्या झुडपात बाबू संगेराव हा दिसून आला व पोलिसांनी त्याला अटक केली.

अशा पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिला जीवे मारून पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा फासणारा गुन्हा करणारा आरोपी बाबू उकडू सांगेराव यांच्या विरोधात जलदगतीने न्यायालयात खटला चालवून व सरकारी वकील म्हणून एडवोकेट श्री उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करून आंध्र प्रदेशाच्या दिशा कायद्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या शक्ती कायद्यानुसार आरोपीस २१ दिवसाच्या आत आरोपी बाबु सांगेराव या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांना आज दि २२.०१.२०२१ रोजी निवेदन देण्यात आले सदरील निवेदनावर शिवराज्य युवा संघटनेचे नांदेड जिल्हा प्रमुख विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड तसेच नायगाव तालुका प्रमुख भाऊसाहेब पाटील चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत