‘मराठी भाषा सवंर्धन पंधरवडानिमित्त खरवड जि. प.शाळेत बालवाचनालय स्थापन

25

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

तळोदा(दि.22जानेवारी):- राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फ राज्यात दि.१४ ते २८ जानेवारी पर्यंत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’राबविण्यात येत आहे.याच धर्तीवर युवकमित्र परिवार,नंदूरबार तर्फ जि.प.उच्च प्राथमिक शाळा खरवड ता.तळोदा येथे ‘बालवाचनालय स्थापन’करण्यात आले.यावेळी वाचनालयाला १२० बालवाचनाची पुस्तके भेट देण्यात आली.मराठी भाषेचे संवर्धन व्हावे,वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी, जास्तीत जास्त विद्यार्थी उद्याचे संस्कारी नागरिक व्हावेत यासाठी वाचनालय स्थापना केल्याचे यावेळी मुख्याध्यापक रवींद्र गिरीधर माळी यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भायाजी जावरे तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना गोसावी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रवींद्र गिरीधर माळी,सहशिक्षक प्रवीण गुलाबराव पाटील,शिक्षिका रक्षा चौधरी यांचे सहकार्य लाभले. तर पुणे येथील शिक्षिका नंदिनी गीते,युवकमित्रचे प्रवीण महाजन यांनी वाचनालयास मोफत पुस्तके उपलब्ध करून दिले.