भोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी:- विभागीय अध्यक्ष राजेश एन भांगे

30

✒️शिवानंद पांचाळ(नायगाव प्रतिनिधी)मो:-९९६०७४८६८२

नायगाव(दि.23जानेवारी):-भोकर तालुक्यातील दिवशी (बू.) येथे दिनांक २० जने.२०२१ रोजी एका पाच वर्षीय निष्पाप निरागस चिमुकलीवर पार्शवी अत्याचार करून निर्घृण खून करून समस्त मानवतेला काळीमा फासणाऱ्या नराधमास जलदगती न्यायालयात खटला चालून तत्काळ निर्णय देवून कठोर (मरेस्तोर. ) फाशीची शिक्षा देऊन पीडित मयत बालिकेला व तिच्या कुटुंबीयांना न्याय द्यावे अन्यथा अखिल भारतीय ओ बी सी महासंघा तर्फे संपूर्ण राज्यभर जनाआंदोलन पुकरन्यात येईल असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक मा प्रमोद शेवाळे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे, मा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मा ग्रहमंत्री अनिलजी देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आले आहे.

तरी यावेळी अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री राजेश एन भांगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री नारायण पांचाळ,जिल्हा उपाध्यक्ष श्री वीरभद्र म्हेत्रे सर, ओबीसी सदस्य श्री नारायण पारेकर सर, श्री आनंद सूर्से सर, श्री शैलेश भांगे सर, ओबीसी सक्रिय, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ, महिला ओबीसी सदस्य सौ.सुरेखाताई पांचाळ,राजू पाटील होळकर व तसेच कुलस्वामिनी वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधि श्री संदीप कांबळे अदी सदस्य उपस्थित होते.