25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.22जानेवारी):-दिनांक 25 जानेवारी हा भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस असुन यावर्षी 25 जानेवारी 2021 ला 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्तरावर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. निवडणूक विषयक जागृती निर्माण करण्याकरीता चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आलेले असून शाळा/महाविद्यालय स्तरावर आयोजीत करण्यात आलेल्या स्पर्धामध्ये गुणनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावरील विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा स्तरावर आयोजीत राष्ट्रीय मतदार दिवसाचे कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

मतदान प्रक्रियेमध्ये युवा मतदारांचा सहभाग वाढावा व त्यांच्यात मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा स्तरावरील राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दिनांक 25 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता करण्यात येणार आहे. “सभी मतदाता बनें: सशक्त, सतर्क, सुरक्षित एवं जागरूक” अशी अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाची थीम निश्चीत करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदारांना मतदानाबाबत शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.