चिमुर येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करुन साजरी

28

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.23जानेवारी):-शिव सेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांची जयंती बाळा साहेबांना अभिवादन करुन व रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करून साजरी करण्यात आली.

शिवसेना चिमुर च्या वतीने अखंड हिन्दुस्थानाचे कवचकुंडल, सामान्य माणसाच्या प्रश्नावर प्रत्यक्ष मैदानात झुन्जणाऱ्या हिंदुत्व आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज असलेले हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाप्रमुख श्री नितिन मत्ते, उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते यांचे मार्गदर्शनानुसार शिवसेना चिमुरच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीहरी सातपुते यांच्या हस्ते करुण उपजिल्हा रुग्णालय येथे रुगनांना फळ व बिस्किट वाटप करून बाळासाहेब ठाकरे याणा विनम्र अभिवादन करण्यात आल.

यावेळी श्रीहरी सातपुते, रमेश भिलकर, सुधीर नन्नावरे, किशोर उकुंडे, अनिल डगवार, कवडु खेड़कर, अक्षय हिवराले, आशीष बगुलकर, डाखरे गुरुजी, सुधाकर निवटे, संतोष कामडी, सारंग भट व इतर शिवसैनिक उपस्थित होते